जळगाव लाईव्ह न्यूज । १५ फेब्रुवारी २०२२। चाळीसगाव बायपास रस्त्यावरील पाटणादेवी चौफुलीजवळ कारला अज्ञात वाहनाने समोरून जोरदार धडक देऊन झालेल्या भीषण अपघातात शहादा येथील दोघेजण जागीच ठार झाले. तर कारमधील अन्य तिघे गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी घडली आहे. आबिद खान अहमद खान पठाण (वय ६२) व शेख शब्बीर शेख जलदीश (वय ६५) अशी मृतांची नावे आहेत. जखमींना शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
जुल्फिकार खान अलमास खान पठाण (वय ४२) हे शहादा येथील गरीब नवाज कॉलनीत कुटुंबासह राहतात. गॅरेजवर मॅकेनिकचे काम करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवतात. ते व त्यांचे सासरे आबिद खान अहमद खान पठाण, सासू रुखसाना अाबिदखान पठाण (वय ५५), सासऱ्यांचा मानलेला मुलगा तहसीब रफिक शेख (वय २५) व मामसासरे शेख शब्बीर शेख जलदिश (रा.खेतिया) हे सर्वजण शहादा येथून सोमवारी पहाटे २ वाजता कारने (एम.पी.४६ सी.ओ.९०१) औरंगाबाद हायकोर्टात तारखेला जाण्यासाठी निघाले होते. कार शब्बीर जलदीश शेख हे चालवत होते.
धडक देणारा चालक पसार
अपघातानंतर अज्ञात वाहनचालक वाहनासह पसार झाला. अपघातात कारची समाेरची बाजू दाबली गेल्याने जखमी कारमध्ये अडकले होते. पोलिसांसह नागरिकांनी जखमींना बाहेर काढले. याप्रकरणी जुल्फिकार खान अलमास खान पठाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला.
हे देखील वाचा :