चोरट्यांचा धुमाकूळ ! जळगावात सराफ दुकान फोडून 14 लाख 59 हजाराचा ऐवज लांबविला

जानेवारी 27, 2024 4:44 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । 27 जानेवारी 2024 । जळगाव शहरासह जिल्ह्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. घरफोडी, दुचाकीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अशातच शहरातील मारुतीपेठ मधील अलंकार ज्वेलर्स आणि शेजारील नूर पॉलिश सेंटर नावाच्या दुकान फोडून चोरट्यांनी तब्बल १४ लाख ५९ हजार रुपयाचा मुद्देमाल लंपास केला. या घटनेने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

chalisgaon gharfodi 44 thousand

याबाबत असे की, शहरातील रामपेठ भागात कुटुंबासह वास्तव्यास आलेले सचिन प्रकाश सोनार (वय-३८) यांचे मारुतीपेठ येथे अलंकार नावाचे दागिने बनवण्याचे दुकान आहे. त्याच बाजूला नूर पॉलिश सेंटर नावाचे देखील पॉलिश मारण्याचे दुकान आहे. शुक्रवार २६ जानेवारी रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दोन्ही दुकान फोडून दोन्ही दुकानातून एकूण १४ लाख ५९ हजार रुपये किमतीचे २५१ ग्रॅम सोन्याचे मटेरियल चोरून नेला.

हा प्रकार पहाटे ४ वाजेच्या सुमारास उघडकीला आला. दरम्यान सचिन सोनार यांनी शनिपेठ पोलीस ठाण्यात धाव देऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार सायंकाळी ७ वाजता शनिपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यान विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रिया दातीर हे करीत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now