⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

देवदर्शन पडले महागात, चोरट्यांनी लांबवली दुचाकी

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑक्टोबर २०२१ । शहरातील दुचाकी चोरीचे प्रमाण कमी होतच नसून दिवसेंदिवस चोरट्यांचे फावले होत आहे. देवदर्शनाला सेवामंडलात गेलेल्या एकाची दुचाकी अवघ्या १५ मिनिटात लंपास केल्याचा प्रकार दि.१४ सप्टेंबर रोजी घडला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील सिंधी कॉलनी परिसरात असलेल्या संत हरदास रामबाबा हौसिंग सोसायटी परिसरात मनोज ग्यानचंद कुकरेजा हे राहतात. ते आन त्यांचा भाऊ दोघे दुचाकी क्रमांक एमएच.१९.बीडी.१३३६ ही वापरतात. दि.१४ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास मनोज कुकरेजा यांनी दुचाकी सेवामंडल बाहेर लावली आणि ते दर्शनासाठी मंदिरात गेले. १५ मिनिटांनी ते दर्शन घेऊन बाहेर आले असता त्यांना दुचाकी मिळून आली नाही. आपली दुचाकी चोरी झाली असल्याची खात्री पटल्यावर त्यांनी याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.