कारच्या धडकेत दुचाकीवरील महिलेसह दोघे जखमी

फेब्रुवारी 18, 2022 9:46 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जानेवारी २०२१ । कारने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील महिलासह दोन जणांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. ही घटना जळगावमधील अजिंठा चौकातील ट्रान्सपोर्ट नगरजवळ महामार्गावर घडली असून याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

accident jpg webp

याबाबत असे की, सोमवारी २४ जानेवारी रोजी सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास जात असतांना अजिंठा चौफुलीच्या पुढे असलेल्या ट्रान्सपोर्ट नगरजवळील महामार्गावर भुसावळकडून भरधाव वेगाने येणाऱ्या कार (एमएच १५ एचक्यू ०९५७) ने दुचाकी(एमएच १९ डीजी ५४९३) ला जोरदार धडक दिली. सोनाली गणेश लोखंडे (वय ४१, रा. अशोकनगर, अयोध्यानगर जळगाव) त्यांचा मुलगा जयेश व बहिणीचा मुलगा वैभव असे तीघे (एमएच १९ डीजी ५४९३) हे जखमी झाले.

या धडकेत दुचाकीवरील तिघे रस्त्याच्या मधोमध फेकले गेले. यात जयेश आणि वैभव हे दोघांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. या प्रकरणी सोनाली लोखंडे यांनी सोमवारी २४ जानेवारी रोजी कारचालकाविरूध्द तक्रार दिली. त्यांच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास विजय पाटील तपास करीत आहेत.

हे देखील वाचा :

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now