भुसावळात दोन बंद घरे फोडली ; लाखोंचा ऐवज लंपास

जून 29, 2021 2:16 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जून २०२१ । पोलिसांच्या अस्तित्वालाच चोरट्यांनी शहरात आव्हान देत चोर्‍या-घरफोड्यांचा सपाटा लावल्याने नागरीकांमध्ये भीती पसरली आहे. जुन्या चोर्‍या-घरफोड्यांचा तपास लागत नसतानाच नव्याने होणार्‍या चोर्‍या पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहे. शहरातील सुरभी नगराजवळ राजेश्‍वरी नगरासह समृद्धी पार्क भागात बंद असलेल्या घराला चोरट्यांनी टार्गेट करीत लाखोंच्या सोन्यासह रोकड लांबवल्याची घटना मंगळवारी पहाटे उघडकीस आल्याने खळबळ उडाली. श्‍वान पथकाला पाचारण करण्यात आल्यानंतर त्याने काही अंतरापर्यंतचा माग दाखवला. घर मालक गावाहून परतल्यानंतर या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

two houses burglarized in bhusawal

चौथ्या मजल्यावरील बंद घर फोडले

सुरभी नगराजवळील राजेश्‍वर नगरातील प्लॅटमध्ये तिसर्‍या मजल्यावर अर्चना अरुण तारे राहतात. कामानिमित्त त्या बर्‍हाणपूर येथे गेल्याने प्लॅटला कुलूप असल्याची संधी चोरट्यांनी साधली. दरवाजाची कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी प्लॅटमध्ये प्रवेश करीत कपाटातील सोन्याच्या महागड्या बांगड्या तसेच 20 हजारांची रोकड लांबवली. विशेष म्हणजे पकडले जावू नये या भीतीने चोरट्यांनी शेजारच्या घरांना कड्या लावल्या.

समृद्धी पार्कातही घरफोडी

समृद्धी पार्कमधील अपार्टमेंटच्या तिसर्‍या मजल्यावर अनिल प्रभाकर धांडे राहतात. पुण्याला ते गेल्यानंतर प्लॅटला कुलूप असल्याची चोरट्यांनी संधी साधत घरफोडी केली. नेमका काय ऐवज चोरीला गेला? याची माहिती कळू शकली नाही. चोरीची माहिती मिळाल्यानंतर बाजारपेठ पोलीस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, सहा.निरीक्षक मंगेश गोंटला, कॉन्स्टेबल विकास सातदिवे, ईश्वर भालेराव, होमगार्ड योगेश सोनवणे भेट देवून पाहणी केली. घर मालक गावाहून परतल्यानंतर या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, श्‍वान पथकाला पाचारण करण्यात आल्यानंतर त्याने काही अंतरापर्यंतचा माग दाखवला तर तज्ज्ञांनी ठसे टिपले.

 

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Stories