जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जून २०२१ । हतनूर प्रकल्प पाणलोट क्षेत्र परीसरात होत असलेल्या पर्जन्यवृष्टीमुळे प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे आज शनिवारी सकाळी ६ वाजेला धरणाचे २ दरवाजे उघडण्यात आले आहेत. प्रकल्पातून १ हजार ७६५ क्यूसेक प्रतिसेकंद वेगाने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जात आहे.

मागील गेल्या दोन तीन दिवसापासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. परंतु जिल्ह्यात समाधानकारक पर्जन्यवृष्टी झालेली नाही. परंतु शेजारील मध्यप्रदेशात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे हतनूर धरणात पाण्याचा साठा वाढला आहे.

प्रकल्प पाणीपातळी २०९.५२० मिटर असून तापी पूर्णा नदीपात्रांत पाणीपातळीत वाढ झाल्याने प्रकल्पाचे चार दरवाजे उघडण्यात आले आहेत.












