लग्नाचे वऱ्हाड घेवून जाणाऱ्या आयशरचा अपघात, २५ ते ३० जण जखमी

मार्च 13, 2022 5:24 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मार्च २०२२ । भरधाव वेगाने जाणाऱ्या दोन आयशरची समोरासमोर धडक झाल्याची घटना आज रविवारी दुपारी रावेर तालुक्यातील खिरोदा गावाजवळ घडली. यामध्ये चालकांसह २५ ते ३० जण गंभीर जखमी झाले आहे.

accident jpg webp

काय नेमकी घटना?
वाघोदा बुद्रुक येथील लग्नाचे वऱ्हाड घेवून जाणारा आयशर ट्रक (एमएच १९ जे ७७३८) ची खिरोदा गावाच्या पुढे पालकडून येणाारी दुसरी आयशर (एमएच १८ एए २०२०)ही भरधाव वेगाने येत असतांना देाघांची समोरासमोर धडक देवून अपघात झाला. ही घटना रविवारी १३ मार्च रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. या अपघातात वऱ्हाडी घेवून जाणाऱ्या ट्रकमधील २५ ते ३० जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींना तातडीने जवळल्या रूग्णालयात दाखल करण्याचे काम सुरू आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now