सप्तशृंगी गडाच्या वारीत दुर्दैवी घटना; जळगाव जिल्ह्यातील दोन भाविकांचा भोवळ येऊन मृत्यू

मार्च 31, 2026 2:59 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । वणी येथील सप्तशृंगी गडाकडे पायी वारी करत असताना जिल्ह्यातील दोन भाविकांचा वेगवेगळ्या ठिकाणी भोवळ येऊन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.परेश धर्मा पवार (वय १७, रा. चौगाव, ता. चोपडा) आणि राजेंद्र रामराव पाटील (४५, रा. जुवार्डी, ता. भडगाव) अशी या मृत भाविकांची नावे आहेत. या घटनेमुळे वारीत सहभागी झालेल्या भाविकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

dd

मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील चौगाव येथून २६ मार्च रोजी पायी दिंडी सप्तशृंगी गडाच्या दिशेने रवाना झाली होती. ही दिंडी २९ मार्च रोजी कळवण तालुक्यातील भेंडी येथे पोहोचली असता भंडारा कार्यक्रमादरम्यान जेवणाच्या रांगेत उभा असलेल्या परेश पवार या युवकाला अचानक भोवळ आली. तो खाली कोसळल्यानंतर त्याला तातडीने मदत करण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी कळवण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान, भडगाव तालुक्यातील जुवार्डी येथील राजेंद्र पाटील पालखीसोबत वणी गडाच्या दिशेने जात असताना मालेगाव तालुक्यातील शेरूळ परिसरात त्यांना अचानक भोवळ आली. त्यांना तातडीने उपचारासाठी धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना २९ मार्च रोजी त्यांचा मृत्यू झाला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now