नशिराबादच्या प्रभारी नगराध्यक्षपदी पंकज महाजन; ढोल-ताशांच्या गजरात पदभार स्वीकारला

सप्टेंबर 9, 2026 5:58 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावच्या नशिराबाद नगरपरिषदेच्या प्रभारी नगराध्यक्षपदाची धुरा आता पंकज महाजन यांच्या खांद्यावर आली आहे. विद्यमान नगराध्यक्ष योगेश पाटील यांनी वैयक्तिक कारणास्तव ७५ दिवसांची रजा घेतल्याने नगराध्यक्षपद रिक्त झाले होते. या पार्श्वभूमीवर पंकज महाजन यांची प्रभारी नगराध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी कुटुंबीयांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला.

pankaj mahajan

महाजन यांच्या पदभार स्वीकारण्याच्या निमित्ताने नशिराबादमध्ये महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठे शक्तिप्रदर्शन केले. ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी महायुतीच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.

पदभार स्वीकारण्याच्या कार्यक्रमाला शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष राधेश्याम चौधरी, शिवसेना महिला आघाडीच्या नेत्या सरिता कोल्हे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नगराध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पंकज महाजन यांनी नशिराबाद शहरातील नागरिकांच्या मूलभूत सुविधांना प्राधान्य देण्याचे संकेत दिले. शहरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी तसेच नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

दरम्यान, महाजन यांच्या नियुक्तीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी काळात प्रभारी नगराध्यक्ष म्हणून ते नगरपरिषदेचा कारभार कशा पद्धतीने पुढे नेतात, याकडे नशिराबादकरांचे लक्ष लागले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now