युवासेनेचा दोन दिवशीय तालुकास्तरीय आढावा बैठक दौरा
जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑक्टोबर २०२२ । युवासेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे व सचिव वरुणजी सरदेसाई साहेब यांच्या आदेशाने युवासेनेतर्फे २९ व ३० ऑक्टोबर २०२२ रोजी जळगाव जिल्ह्याचा दोन दिवसीय तालुकास्तरीय आढावा बैठक दौरा युवासेना विभागीय सचिव विराज कावडीया व युवासेना विस्तारक चैतन्य बनसोडे यांच्या मुख्य उपस्थित संपन्न होणार आहे. २९ रोजी रावेर लोकसभा व ३० ऑक्टोबर रोजी जळगाव लोकसभेतील तालुक्यात सदर आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
या वेळी युवासेना पदाधिकारी यांच्याशी संघटना बांधणीवर चर्चा, युवासेनेच्या काम करण्याची इच्छा असणाऱ्या युवकांच्या भेटी, नवीन पदाधिकारी यांच्या नियुक्ती विषयी चर्चा, तालुकास्तरावर केलेल्या कार्याचा आढावा, महाराष्ट्राच्या युवकांसमोरील आवाहन, येणाऱ्या निवडणुकीत युवासेनेची भूमिका आदी विषयांवर चर्चा होणार आहे.
युवासेना रावेर लोकसभेचे जिल्हायुवाधिकारी चंद्रकांत शर्मा, जळगांव लोकसभेचे जिल्हायुवाधिकारी निलेश चौधरी, जिल्हायुवाधिकारी पियुष गांधी, जळगाव लोकसभा कॉलेज कक्ष अधिकारी प्रितमी शिंदे या दौऱ्यात उपस्थित राहणार आहे.