कुसुंबाजवळ अपघात, बसच्या धडकेत दुचाकीस्वार दोघे ठार

जून 22, 2021 4:01 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जून २०२१ । जळगाव तालुक्यातील कुसुंबा जकात नाक्याजवळ एसटी बसने दोन दुचाकीला दिलेल्या धडकेत दोन जणांचा जागेवरच मृत्यू झाला तर तीन जण किरकोळ जखमी झाल्याची घटना  आज मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. गजानन किसन बावस्कर (वय ३८) लीलाबाई धोंडू सोनार (वय ५५)  असे अपघातातील मृतांचे नाव आहे.  

accident

याबाबत असे की, जामनेर तालुक्यातील चिंचखेड येथील गजानन बावस्कर हे मित्राच्या आईला जळगावात इएसआयसीच्या कामासाठी घेऊन आले होते. काम आटोपून ते घरी परतत असताना कुसुंबा जकात नाक्याजवळ एसटी महामंडळाच्या औरंगाबाद डेपोच्या बसने त्यांना मागून जोरदार धडक दिली. त्यात दोघांचा जागेवच मृत्यू झाला.   

तर दुसर्‍या दुचाकीलाही बसने धडक दिली. यात बाळू धोंडू सोनार, त्यांची पत्नी सुनीता आणि योगेश हे किरकोळ जखमी झाले. त्यांना शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतदेह सिव्हील हॉस्पीटलला पाठविण्यात आले आहेत. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now