जळगाव जिल्ह्यात दोन बस समोरासमोर धडकल्याने भीषण अपघात; अनेक प्रवासी जखमी

नोव्हेंबर 5, 2024 5:41 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ नोव्हेंबर २०२४ । राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसला होणाऱ्या अपघाताचे घटना वाढताना दिसत असून यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याच दरम्यान, जळगाव जिल्ह्यात दोन बस समोरासमोर धडकल्याने भीषण अपघात झाला सून यात २५ ते २७ प्रवासी जखमी झाले आहेत.जखमींना लागलीच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

bus accident

जळगावच्या कन्नड- चाळीसगाव बायपास हायवेवर आज सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे व कन्नड डेपोची बस समोरासमोर धडकली. या बसमधील तब्बल २५ ते २७ प्रवासी जखमी झाले. या अपघातातील जखमींना तात्काळ चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात परिसरातील नागरिकांनी उपचारासाठी दाखल केले. या अपघातात धुळे व कन्नड डेपोच्या बसचे मोठे नुकसान झाले आहे. नेमका हा अपघात कसा झाला याबाबत अद्याप माहिती करू शकली नाही.

जखमी उपचारासाठी दाखल
अपघात झालेल्या दोन्ही बसमध्ये प्रवासी होते. यात एका बसच्या वाहकाकडील साईड दाबली गेल्याने त्या बसमधील प्रवाशी जखमी झाले आहेत. सर्व जखमींना लागलीच उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान या अपघातात दोन्ही बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now