जळगाव लाईव्ह न्यूज । २० फेब्रुवारी २०२२ । दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक ठार तर तिघे जखमी झाल्याची घटना पाचोरा ते मोंढाळा रस्त्यावर घडलीय. सागर विजय परदेशी (वय-२८) असे या मयताचे नाव आहे.
याबाबत असे की, पाचोरा ते मोंढाळा रस्त्यावरील म्हसोबा बाबा मंदिराजवळ दि.१९ फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास एम.एच.१९-डी.ई.३२९६ व एम.एच.२१ – ए.ए.२५३९ या दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. यात पाचोरा तालुक्यातील सातगाव (डोंगरी) येथील सागर परदेशी याचा जागीच मृत्यू झाला. तर अंतुर्ली येथील यमराज धर्मराज पाटील, गणेश भीमराव पाटील व गोपाल हारसिंग पाटील हे तिघे जखमी झाले आहे.
जखमींना पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. ही धडक इतकी जोरदार होती की, या अपघातातील दोन्ही दुचाकांचा खुर्दा झालेला आहे. या अपघाताबाबत पुढील तपास पाचोरा पोलीस करत आहेत.
हे देखील वाचा :
- पालकमंत्र्यांची यादी जाहीर; जळगावच्या पालकमंत्री पदाची माळ पुन्हा गुलाबराव पाटील यांच्या गळ्यात
- मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ही आनंदापेक्षा जबाबदारीची बाब..
- Muktainagar : वडोदाचा ग्रामविकास अधिकारी निलंबित; नेमकं कारण काय?
- प्रतीक्षा संपली! ICC चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा, कोणाला संधी? कोणाला डच्चू मिळाला?
- Jalgaon : मराठी कामगारांवर अन्याय, मनसेनं आपल्या स्टाईलने परप्रांतीय मॅनेजरला शिवकला धडा, VIDEO व्हायरल