⁠ 
शनिवार, जून 15, 2024

दुर्दैवी : वादळापासून बचावला घेतला कंटेनरचा आडोसा, कंटेनर उलटून दोघांचा गेला बळी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ एप्रिल २०२३ । अचानक आलेल्या वादळामुळे उभा कंटेनर पालटला आणि आडोश्याला उभे असलेले दोन जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला अशी घटना जळगाव तालुक्यातील चिंचोली गावाजवळील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामाच्या ठिकाणी घडली आहे.

गुरूवारी २७ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास हि धक्कादाक घटना घडली. संबंधित जखमी व्यक्तीला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. तर भोला श्रीकुसूम पटेल रा. सानीकावा जि. सिवान बिहार आणि चंद्रकांत वाभळे (वय-५२) रा.चाळीसगाव ह.मु. पुणे असे मयत झालेल्या व्यक्तीचे नावे आहे.

अधिक माहिती अशी कि. जळगाव तालुक्यातील चिंचाली गावाजवळ नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकामाचे काम सुरू आहे. या बांधकाचा कंत्राट पुण्यातील न्याती कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले आहे. गेल्या जानेवारीपासून या कामाला सुरूवात करण्यात आली आहे. या ठिकाणी काही बिहार राज्यातील मजूर हे दोन महिन्यांपासून काम करत आहे. गुरूवारी २७ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास अवकाळी वादळ सुरू झाले. आलेल्या मोठ्या वादळापासून जीव वाचविण्यासाठी येथील मजूर पत्र्याच्या शेडमध्ये गेले. परंतू वादळी वाऱ्याचा वेग जास्त असल्याने पत्र्याचे शेड देखील उडाली. त्यामुळे शेडमधील मजूर हे पटांगणात उभा असलेल्या कंटेनरच्या बाजूला आडोसा घेतला. दरम्यान, सुसाट वेगाने सुरू असलेल्या वादळी वाऱ्यामुळे कंटेनर देखील पलटी झाला. या कंटेरनखाली भोला श्रीकुसूम पटेल रा. सानीकावा जि. सिवान बिहार आणि चंद्रकांत वाभळे (वय-५२) रा.चाळीसगाव ह.मु. पुणे हे दोघे दाबले गेल्याचे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

तर सोबत असलेला अफरोज आलम (वय-२३) रा. कुंडाळे जि. पुरण्या बिहार हा जखमी झाला. जखमीला तातडीने जिल्हा शाासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. तर क्रेनच्या मदतीने कंटेनर बाजूला करून मृतदेह बाहेर काढण्यात आले. घटना घडल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.