⁠ 
सोमवार, मे 20, 2024

जळगावात तरुणाची सुसाईट नोट लिहून आत्महत्या ; पहा काय लिहिलंय सुसाईट नोटमध्ये?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मे २०२३ । जळगाव शहरातील शिव कॉलनी परिसरातील अक्षय विलास सुर्यवंशी या २६ वर्षीय तरूणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ज्या ठिकाणी अक्षयने आत्महत्या केली, त्या ठिकाणी पोलिसांना अक्षयने मृत्यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठी मिळून आली आहे.या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जळगाव शहरातील शिवकॉलनी परिसरात अक्षय सुर्यवंशी हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला असून तो खासगी कंपनीत तसेच मिळेल ते काम करून तो आपला उदरनिर्वाह करत होता. दरम्यान, मध्यरात्री सर्वजण झोपलेले असताना अक्षयने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला. यावेळी मृतदेह पाहून घरच्यांनी आक्रोश केला.

दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यावर रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. यावेळी पोलिसांना अक्षयने आत्महत्या केली, त्या ठिकाणी पोलिसांना अक्षयने मृत्यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठी मिळून आली आहे.

काय लिहिलंय सुसाईट नोटमध्ये?
आत्महत्या करण्यापूर्वी तरुणाने एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. ‘शिक्षण झालं, पण घरच्यांच्या अपेक्षा, स्वप्न पूर्ण नाही करु शकलो. ओझं झालोय मी, अजून त्रास नाही देऊ शकत, म्हणून मी जातोय, कोणाला जबाबदार धरू नये” अशा आशयाची सुसाईड नोट लिहून ठेवली होती. पोलिसांनी चिठ्ठी हस्तगत केली आहे. या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.