गावठी पिस्टलसह दोघे जाळ्यात : चोपडा पोलिसांची कारवाई

जळगाव लाईव्ह न्यूज । १० नोव्हेंबर २०२२ । गावठी कट्ट्याची तस्करी करताना चोपडा पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. सत्रासेन गावाजवळ ही कारवाई चोपडा ग्रामीण पोल्लिसांनी केली. या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

गोपनीय माहितीवरून कारवाई
चोपडा तालुक्यातील सत्रासेन गावाजवळील फाट्याजवळ चारचाकी (एम.एच.19.1430) मध्ये विना परवाना शस्त्र खरेदी-विक्री होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचण्यात आला. संशयीत आरोपी छगन किसन कोळी (72) व ज्ञानेश्वर मोहन शिरसाठ (42, भोरटेक, ता.शिरपूर) यांच्या ताब्यातून 25 हजार रुपये किंमतीची गावठी बनावटीचा कट्टा तीन लाख रुपये किंमतीची स्वीप्ट जप्त करण्यात आली. या प्रकरणी नाईक शशीकांत पारधी यांच्या फिर्यादीनुसार चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करणयात आला. तपास हवालदार शिवाजी बाविस्कर हे करीत आहेत.