जळगावातील प्रसिद्ध कासट ग्रुपच्या कार्यालयातून अडीच लाखांची रक्कम लंपास

ऑगस्ट 7, 2023 3:55 PM

जळगाव लाईव्ह न्यूज| ७ ऑगस्ट २०२३। जळगाव येथील प्रसिद्ध व्यावसायिक कासट ग्रुप यांच्या कार्यालयाचा दरवाजा तोडून चोरट्यांनी कॅबिनमधील अडीच लाखांची रक्कम लंपास केली. कासट ग्रुपचे संचालक अशोक कासट व शरद कासट यांचे पाळधी येथे महामार्गावर घर व तेथेच आवारात त्यांचे व्यावसायिक कार्यालय आहे. तेथूनच त्यांचे सर्व व्यवहार होत असतात. ते विट भट्टीच्या व्यवसायाबरोबरच सरकारी कंत्राटदार आहेत.

Untitled design 2 jpg webp

त्यांच्या कार्यालयात जवळपास सहा कॅबिन आहेत. रविवारी (ता. ६) पहाटे चारच्या सुमारास कार्यालयातील खिडकीचे ग्रिल तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला व प्रत्येक कॅबिन उघडून ड्रॉवरमधून पैसे काढले. यात शरद कासट यांचे ४० हजार, शैलेश कासट यांचे १ लाख, आशिष कासट यांचे ७० हजार, अमर कासट यांचे ५० हजार असा एकूण २ लाख ६० हजारांचा रोख ऐवज लंपास केला.

कार्यालयात चोरटे घुसल्याची चाहुल रखवालदारास लागली. त्यावेळी चोरट्यांनी त्याला दगड फेकून मारले. त्याने आरडाओरड करताच घरातील सर्व जण जागे झाले. मात्र, तोपर्यंत चोरट्यांनी पळ काढला. सीसीटीव्हीचा डीव्हीआरही त्यांनी पळवून नेला. माहिती मिळताच पोलिसांचे पथक दाखल झाले. त्यांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यात त्यांना यश मिळाले नाही. घटनास्थळी फिंगरप्रिंट पथक दाखल होऊन त्यांनी ठसे घेतले.

अमळनेर भागाचे पोलिस उपअधीक्षक सुनील नंदवालकर, धरणगाव ठाण्याचे निरीक्षक उद्धव ढमाले, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे आदींनी घटनास्थळी भेट दिली. याबाबत अनिल कासट यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून, उमेश भालेराव आदी तपास करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now