गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात क्षयरोग दिन जनजागृती

मार्च 26, 2026 3:46 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जागतिक क्षयरोग दिननिमित्त गोदावरी नर्सिंग महाविद्यालय, जळगावच्या मेडिकल सर्जिकल नर्सिंग विभागामार्फत क्षयरोगाबाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

Tuberculosis Day Awareness

या कार्यक्रमाचा उद्देश क्षयरोगाचा प्रतिबंध, लवकर निदान आणि प्रभावी उपचार याबाबत समाजात जागरूकता निर्माण करणे हा होता. दरवर्षी २४ मार्च रोजी साजरा होणारा जागतिक क्षयरोग दिन हा क्षयरोगाविरुद्ध जनजागृती वाढवण्यासाठी आणि या आजाराच्या निर्मूलनासाठी जागतिक स्तरावर प्रयत्नांना चालना देण्यासाठी साजरा केला जातो. यावर्षीचा विषय होय! आपण क्षयरोग संपवू शकतो: देशांच्या नेतृत्वाखाली, लोकांच्या सामर्थ्याने असा असून, देशांचे नेतृत्व आणि जनसहभाग यांच्या बळावर क्षयरोगाचा अंत शक्य आहे, असा संदेश या थीममधून देण्यात आला आहे.

कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलचे रेसिडेंट डॉ. सौरव मुले यांनी क्षयरोग: सद्य आव्हाने आणि निर्मूलनासाठीच्या रणनीती या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी क्षयरोगाची लक्षणे, आधुनिक निदान पद्धती, औषधोपचार, तसेच औषधांचा पूर्ण कोर्स घेण्याचे महत्त्व याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच क्षयरोग निर्मूलनासाठी आरोग्यसेवक, विद्यार्थी आणि समाज यांचा सक्रिय सहभाग अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.यानंतर विद्यार्थ्यांसाठी रिल्स सादरीकरण स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी क्षयरोगाबाबत जनजागृती करणारे सर्जनशील आणि माहितीपूर्ण व्हिडिओ सादर केले.

विद्यार्थ्यांचा उत्साह, सामाजिक आरोग्याबाबतची संवेदनशीलता आणि जनजागृतीसाठीची बांधिलकी यावेळी प्रकर्षाने दिसून आली.हा कार्यक्रम अत्यंत माहितीपूर्ण व प्रेरणादायी ठरला. क्षयरोगाविरुद्धच्या लढ्यात जनजागृती, वेळेवर निदान आणि उपचार यांचे महत्त्व अधोरेखित करत सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now