निंबाच्या झाडावर आदळला ट्रक; चालक ठार

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ मे २०२२ । भरधाव आयशर ट्रक निंबाच्या झाडावर आदळून चालक ठार झाल्याची घटना यावल तालुक्यात घडली. यावल ग्रामीण रुग्णालयात मयत चालकाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.

accident 26

फैजपूरकडून भुसावळकडे पाईप घेऊन जाणारा भरधाव आयशर ट्रक (एम.पी.68 एच.0133) भुसावळ-फैजपूर रस्त्यावर पाडळसे गावाजवळील वळणावर निंबाच्या झाडावर आदळल्यानंतर पलटी झाला. या अपघातात चालक तरुण प्रेमचंद महाजन (35, रा.बहादरपूर, मध्यप्रदेश) हा जागीच ठार झाला.

अपघाताची माहिती मिळताच धीरज पाटील, विजय पाटील, नकुल पाटील, रजनीकांत पाटील, प्रवीण तायडे, संग्राम कोळी, पांडुरंग कोळी यांनी मदत कार्य केले. यानंतर फैजपूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सिद्धेश आखेगावकर, उपनिरीक्षक मकसूद शेख, सुरेश खैरनार, उमेश सानप, विकास सोनवणे, देविदास सुरदास, गोकूळ तायडे, किरण चाटे, योगेश दुसाणे आदींनी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. यावल ग्रामीण रुग्णालयात मयत चालकाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now