गुन्हेजळगाव शहर

Jalgaon : ट्रकने पुढे जाणाऱ्या दाम्पत्याच्या दुचाकीला उडविले, पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ मे २०२३ । जळगावात रस्त्ये अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले असून अशातच आणखी एका अपघाताची बातमी समोर आलीय. यात ट्रकने पुढे जात असलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात पतीचा दुर्दैवी मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना आज शनिवारी बांभोरी येथील जैन कंपनीसमोर घडली.

हेमंत काशिनाथ चौधरी (वय-५०) रा. खोटे नगर, जळगाव असे मृताचे नाव आहे तर माधवी हेमंत चौधरी (वय-४५) असं मृताच्या पत्नीचे नाव आहे. दरम्यान, जखमी महिलेस जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

नेमकी काय आहे घटना?
जळगाव शहरातील खोटे नगर परिसरात हेमंत चौधरी हे शहरातील पोलनपेठ परिसरात मेडीकल डिस्ट्रीब्यूटर येथे कामाला आहे तर त्यांच्या पत्नी माधवी बांभोरी गावाजवळील जैन कंपनीत कामावर आहे. नेहमीप्रमाणे शनिवारी २७ मे रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास पत्नीला कामावर सोडण्यासाठी हेमंत चौधरी हे दुचाकीने खोटेनगराकडून जैनकंपनीकडे दुचाकीने निघाले. जैनकंपनी जवळून जात असतांना बांभोरी गावानजीक एका भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली.

या धडकेत चौधरी दाम्पत्य हे दुचाकीसह रोडच्या खाली फेकले गेल्याने दोघांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. रस्त्यावरील स्थानिक ग्रामस्थ व तरूणांच्या मदतीने जखमींना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपारार्थ दाखल करण्यात आले. मात्र यात हेमंत चौधरी यांचा उपचारादरम्यान आज दुपारी अडीच वाजता मृत्यू झाला. या घटनेबाबत पोलीसात अद्यापपर्यंत कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button