Gold Rate : आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याचा भाव घसरला, आता 24 कॅरेटचा भाव किती?

मे 26, 2025 12:37 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मे २०२५ । सोने दरात कधी वाढ तर कधी घसरण दिसून येत आहे. गेल्या आठवड्यात सोने दरात मोठी वाढ झाल्याने खरेदीदारांना झळ बसत आहे. अशातच आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोने दरात घसरण झाली. यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

gold silver jpg webp

आज सोमवारी (२६ मे) सोन्याचे भाव प्रति तोळा ४४० रुपयांनी कमी झाले आहेत. सोन्याच्या किमतीसोबतच चांदीच्या किमतीतही घसरण झाली आहे. सोने दरात झालेल्या घसरणीनंतर १ तोळा सोन्याचे दर ९७,६४० रुपये आहे. काल हेच दर ९८,०८० रुपये होते. या किंमती घसरल्या आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ७८,११२ रुपये आहेत. या दरात ३५२ रुपयांनी घट झाली आहे.

आज २२ कॅरेट सोन्याचे दर ४०० रुपयांनी घसरले आहेत. १ तोळा सोन्याचे दर ८९,५०० रुपये आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ७१,६०० रुपये आहेत. या किंमतीत ३२० रुपयांनी घट झाली आहे. १८ कॅरेटच्या सोन्याच्या दरात ३३० रुपयांनी घट झाली आहे. आज १ तोळा सोने ७३,२३० रुपये प्रति तोळ्यावर विकले जात आहे.

सोन्यासोबतच चांदीच्या किमतीतही घसरण झाली आहे. चांदीचा भाव ९७,८७८ रुपये प्रति किलो आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment