ट्रक पुलाचा कठडा तोडून नाल्यात ; चालक ठार, दोघे जखमी

जुलै 27, 2025 1:03 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । म्हसावद ते वावडद्यादरम्यान आसारी घेऊन जात असलेला ट्रक पुलाचा कठडा तोडून नाल्यात कोसळल्याने चालक धर्मेंद्रसिंग शंकरसिंग राजपूत (३५, रा. बहाद्दरपूर, जि. रतलाम, मध्य प्रदेश) हे ठार झाले. तसेच ट्रकमधील दोघे जण जखमी झाले. या एमआयडीसी पोलिस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

jalgaon mahanagar palika 10 jpg webp

मध्य प्रदेशकडून आसारी घेऊन जाणारा एक ट्रक तालुक्यातील म्हसावद ते वावडदा दरम्यान कुरकुर नाल्याजवळ आला असताना चालकाचा ताबा सुटला व हा ट्रक कठडा तोडून नाल्यात कोसळला, या अपघातात चालक धर्मेंद्रसिंग राजपूत यांना जबर मार लागला. तर कालुसिंग हिरालाल राठोड व राहुल राठोड (दोघे रा. बहाद्दरपूर, जि. रतलाम, मध्य प्रदेश) हे दोघे जण जखमी झाले.

अपघातानंतर जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता धर्मेंद्रसिंग यास डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणी कालू राठोड यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now