….म्हणून माझ्यामागे ईडी लावली : एकनाथराव खडसे

ऑक्टोबर 1, 2021 4:36 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑक्टोबर २०२१ । पुण्यातील भोसरी जमीन प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. दरम्यान, या ईडीच्या कारवाईवरून एकनाथराव खडसे यांनी घणाघात टीका केली आहे. ज्याचा बाप ‘मास्तर’ होता त्यानं हजार बाराशे कोटीची मालमत्ता जमवली त्यांची चौकशी होतं नाही आणि मी बीएचआरच्या ठेवीदारांचा प्रश्न उचलला म्हणून मला ‘ईडी’ माध्यमातून नाहक त्रास दिला जात असल्याचा घणाघात  खडसे यांनी केला. आज एकनाथ खडसे यांनी बोदवड येथील एका कार्यक्रमाला उपस्थिती दिली त्यावेळी ते बोलत होते.

khadse (1)

पुढे बोलतांना ते खडसे म्हणाले की, आपण कधीही भाड्याच्या घरात नव्हतो, ज्यांनी भाड्याच्या घरात दिवस काढले त्यांची हजार बाराशे कोटीची मालमत्ता कशी असा प्रश्न उपस्थित केला. आपण फक्त बीएचआरबाबत आवाज उठवला म्हणून आपल्यावर ईडीची कारवाई करण्यात आल्याचा आरोप खडसे यांनी केला.

दरम्यान, तीन दिवसापूर्वी ईडीच्या पथकाने एकनाथराव खडसे यांना अटक केली, त्यांना समन्स बजावले असे संदेश सोशल मिडियात फिरत होते. त्यावर खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी कुठलीच कारवाई झाली नसल्याचं म्हटलं होतं.

ही बातमी पण वाचा….

ही बातमी पण वाचा 

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now