⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

छत्रछाया फाऊंडेशनच्या संस्कारवर्गाची तरसोदला सहल

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ एप्रिल २०२२ । छत्रछाया फाउंडेशन तर्फे सुरू असलेल्या संस्कार वर्गाची एक दिवसीय सहल तरसोद येथील गणपती मंदिरात नेण्यात आली. यामुळे मुलांना पर्यावरणाचे महत्व समजावले तसेच लगोरी, आंधळी कोशमबीर, मामाचे पत्र हरवले, फुगडी, नदी का पहाड असे विविध मैदानी खेळ मुलांना खेळवण्यात आले.

यावेळी मुलांनी आपण संस्कार वर्गात शिकत असलेल्या अनुभवाचे कथन केले, सोबत एकत्रित डबा भोजनाचा आनंद देखील विद्यार्थ्यांनी यावेळी घेतला. या सहलीची सांगता साने गुरुजी यांची ‘हीच आमुची प्रार्थना’ प्रार्थना घेत करण्यात आली. यावेळी छत्रछाया फाउंडेशन च्या उपाध्यक्षा छाया पाटील, सचिव रिद्धी वाडीकर, कोषाध्यक्ष सुनीता वाडीकर, सदस्य मयुरी वाडीकर उपस्थित होते.