⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

अपघातातील जखमींवर उपचार करा; पोलिसांचा ससेमिरा पाठीमागे लागणार नाही – डॉ.प्रवीण मुंढे

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मे २०२२ । रस्ते अपघातात जखमींवर उपचार करणर्‍या डॉ.योगीता पाटील यांचे कार्य सर्वांसाठी आदर्श आहे. जगात सर्वात जास्त रस्ते अपघातात मृत्यू भारतात होतात. त्यापैकी जळगाव जिल्ह्यात वर्षाला चारशे ते पाचशे अपघाती मृत्यू होतात. पोलिस प्रशासनाचा ससेमिरा मागे लागू नये, म्हणून नागरीक रस्ते अपघात जखमी झालेल्यांना मदत करत नाही. परंतु, मी स्वत: डॉक्टर असून जिल्ह्यात कुठेही रस्ते अपघातात झाल्यास जखमींवर उपचार करा, आपल्या मागे कुठलाही ससेमिरा लागणार नाही, अशी ग्वाही जिल्हा पोलिस अधीक्षक.डॉ.प्रवीण मुंढे यांनी शहरात दिली.

रावेरात जीवन रक्षक कीटचे वाटप
रावेर पोलिस स्टेशनतर्फे ‘चला कर्तव्य निभवू या’ जीवन रक्षक किट वितरण रावेर पोलिस स्टेशनच्या आवारात करण्यात आले. यावेळी रावेर शहरातील डॉक्टरांना जीवन रक्षक किट वाटप करण्यात आली. यावेळी डॉ.योगीता पाटील यांनी रस्ते अपघात जखमी झालेल्या रुग्णांवर तत्काळ उपचार केल्याने त्यांचा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
या कार्यक्रमास अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे, सहा.पोलिस निरीक्षक शीतलकुमार नाईक, पोलिस उपनिरीक्षक विशाल पाटील, सचिन नवले, मनोहर जाधव, दीपाली पाटील, डॉ.एस.आर.पाटील, डॉ.गुलाबराव पाटील, डॉ.ताराचंद सावळे, डॉ.प्रवीण चौधरी, डॉ.मिलिंद वानखेडे, डॉ.भगवान कुवटे, डॉ.संदीप पाटील, गोविंद महाजन आदी उपस्थित होते. यावेळी पोलिस कर्मचारी बिजु जावरे, सोनू तडवी, पुरूषोत्तम पाटील, माधवी मोरे आदींची उपस्थिती होती. प्रस्तावना पोलिस निरीक्षक कैलास नागरे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ.मिलिंद वानखेडे यांनी मानले.

रस्त्यावर जखमी झालेल्यांना मदत करा
सर्व डॉक्टर व सुजान नागरीकांनी रस्त्याने प्रवास करत असतांना अपघातात जखमी झालेल्या नागरीकांना तत्काळ उपचारासाठी मदत करावी, प्रवासा दरम्यान आपण डॉक्टर असल्यास त्यांच्यावर उपचार करावे तर नागरीक असल्यास त्यांना ग्रामीण रुग्णालयापर्यंत पोहचविण्यास मदत करावी व आपल्या मागे कोणताही पोलिसांचा ससेमिरा लागणार नसल्याची हमी पोलिस निरीक्षक कैलास नागरे यांनी प्रसंगी दिली.