गुरूवार, जून 8, 2023

मोठी बातमी : राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, जळगावातील बदली झालेले अधिकारी असे?

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ मे २०२३ । महाराष्ट्रातील 140 हून अधिक अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून यात गडचांदूर, चंद्रपूरचे पोलीस उपअधीक्षक सुशीलकुमार काशीबाराव नायक यांची जळगाव शहर पोलीस उपअधीक्षकपदी बदली झाली आहे. तर भुसावळचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांची संगमनेर, जि.अहमदनगर पोलीस उपअधीक्षकपदी बदली झाली असून त्यांच्या जागी धर्माबाद, जि.नांदेड उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक विक्रांत हिंमत गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

दुहेरी हत्याकांडाच्या घटनेनं भुसावळ हादरलं

जळगावातील बदली झालेले अधिकारी असे?
जळगाव मुख्यालयातील संदीप रघुनाथ गावीत यांची पाचोरा उपविभागाच्या पोलीस उपअधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.
जळगाव आर्थिक गुन्हे शाखेचे भास्कर प्रभाकर डेरे यांची पिंपरी-चिंचवड सहाय्यक पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आली.
गडचांदूर, चंद्रपूरचे पोलीस उपअधीक्षक सुशीलकुमार काशीबाराव नायक यांची जळगाव शहर पोलीस उपअधीक्षकपदी बदली झाली आहे.
अमळनेर पोलीस उपअधीक्षक राकेश रावसाहेब जाधव यांची जालना पोलीस प्रशिक्षण केंद्रात पोलीस उपअधीक्षकपदी बदली करण्यात आली.