जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ डिसेंबर २०२१ । मध्य रेल्वे ठाणे-दिवा 5 व्या आणि 6 व्या मार्गावरील वळणासाठी नव्याने टाकलेल्या रुळावरून सध्याच्या धीम्या मार्गावरील रूळांना जोडण्यासाठी कळवा आणि दिवा दरम्यानच्या अप आणि डाऊन धीम्या मार्गांवर विशेष पायाभूत सुविधा ब्लॉक घेणार आहे. हा ब्लॉक रविवारी (दि.२) रात्रीपासून सोमवारी (दि.३) पहाटे २ पर्यत असेल. यामुळे रविवारी ३, तर साेमवारी ११ गाड्या रद्द झाल्या आहेत.
१ जानेवारीला रात्री ११.५२ ते २ जानेवारीच्या रात्री ११.५२ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या कल्याणहून सुटणाऱ्या अप धीम्या/अर्ध जलद सेवा कल्याण आणि मुलुंड दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. मुलुंड स्थानकावर या सेवा पुन्हा अप धिम्या मार्गावर वळवल्या जातील.
या गाड्यांचे शाॅर्ट टर्मिनेशन :
१ जानेवारीला सुटणारी हुबळी-दादर एक्स्प्रेस पुणे येथे टर्मिनेट केली जाईल. २ जानेवारीला सुटणारी दादर-हुबळी एक्स्प्रेस दादर ऐवजी पुण्याहून साेडण्यात येईल. १ जानेवारीला सुटणारी कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेस पुणे येथे टर्मिनेट केली जाईल. २ जानेवारीला सुटणारी मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस मुंबईऐवजी पुणे हून सुटेल.
रद्द झालेल्या रेल्वे गाड्या पुढीलप्रमाणे
शनिवारी (१ जानेवारी) १२११२ अमरावती-मुंबई, १२१४० नागपूर-मुंबई सेवाग्राम, १७६११ नांदेड-मुंबई राज्य राणी एक्स्प्रेस, तर रविवारी (दि.२) अप-डाऊन मुंबई-पुणे डेक्कनक्विन, अप-डाऊन मुंबई-जालना-मुंबई जनशताब्दी, अप-डाऊन मुंबई-मनमाड-मुंबई पंचवटी, अप-डाऊन मुंबई-आदिलाबाद नंदीग्राम एक्सप्रेस, अप-डाऊन मुंबई-पुणे-मुंबई डेक्कनक्वीन, मुंबई-अमरावती, अप-डाऊन मुंबई-नागपूर सेवाग्राम, मुंबई-गदग एक्सप्रेस, मुंबई-नांदेड राज्यराणी एक्सप्रेस धावणार नाहीत.
हे देखील वाचा :
- साप पकडणे जीवावर बेतले; दंश केल्याने शेतमजुराचा मृत्यू
- विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! १०वी आणि १२वी परीक्षेच्या तारखा जाहीर
- राष्ट्रीय युवा महोत्सव अंतर्गत ‘भारत यंग लीडर्स डायलॉग’ चर्चासत्रात भाग घेण्यासाठी तरुणांना आवाहन
- मुक्ताईनगरमध्ये लागणार धक्कादायक निकाल; संभाव्य आमदार कोण? पाहा..
- उमेदवारांनो मुंबई गाठा! निकलाआधी शरद पवारांच्या महत्त्वाच्या सूचना, वाचा काय आहेत?