जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑक्टोबर २०२५ । दिवाळीचा काळ सुरु असून यादरम्यान रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर रेल्वेकडून दिवाळी आणि छठ पूजा सणाच्या निमित्ताने विशेष गाड्या सुरु केल्या असून यातच आता रेल्वे प्रशासनाने मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि बनारसदरम्यान आठ विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष या गाडीला जळगाव आणि भुसावळ स्थानकावर थांबा देण्यात आल्याने जिल्ह्यातील प्रवाशांना दिलासा मिळाला.

मुंबई – बनारस (क्र. ०१०३१ विशेष गाडी) : १८, २२, २६ आणि ३० ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ०७:३५ वाजता मुंबई सीएसएमटी येथून रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी १३:३५ वाजता बनारस येथे पोहोचेल तर बनारस – मुंबई (क्र. ०१०३२ विशेष गाडी) : १९, २३, २७आणि ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १६:०० वाजता बनारस येथून निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०८:२० वाजता मुंबई सीएसएमटी येथे पोहोचेल.

या स्थानकांवर असेल थांबा ?
या गाडीला दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी आणि वाराणसी येथे थांबतील.








