जळगाव लाईव्ह न्यूज । केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार नाफेड अंतर्गत हंगाम २०२४-२५ तूर खरेदीसाठी जळगाव जिल्ह्यात पणन महासंघामार्फत अमळनेर, पारोळा, चोपडा, धरणगाव, कासोदा, म्हसावद, जळगाव, भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, पाचोरा, भडगाव व चाळीसगाव असे एकूण १६ खरेदी केंद्र कार्यरत आहे. शेतकऱ्यांना २२ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. २०२४-२५ करीता तूर हमीभाव ७५५० रुपये इतका आहे.

शेतकऱ्यांनी तूर नोंदणीचा लाभघेऊन ऑनलाइन नोंदणीसाठी, आधारकार्ड, बँक पासबुक व ऑनलाइन पीकपेरा नोंद असलेला ७/१२ उतारा, ८अ इ. कागदपत्रे घेऊन खरेदी केंद्रांवर तूर नोंदणी करावी, असे आवाहन विभागीय संचालक मंत्री संजय सावकारे, उपाध्यक्ष रोहित निकम, संचालक संजय पवार तसेच प्र. जिल्हा पणन अधिकारी एस.एस. मेने यांनी केले आहे. विसनजी नगरातील कृषी औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्थेत नोंदणी पोर्टल सुरू आहे.