⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

जळगाव जिल्ह्यातील २७ हजार शेतकऱ्यांना एकूण २८ कोटींची मदत जाहीर

जळगाव लाईव्ह न्यूज | १० जानेवारी २०२३ | राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. ती म्हणजे पुणे आणि नाशिक विभागातील दहा जिल्ह्यातील सहा लाख ३२ हजार ८९३ शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या भरपाईपोटी बुधवारी ६७५ कोटी ४५ लाख १० हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला. त्यात जळगाव जिल्हयातील तब्बल २७,३७० शेतकऱ्यांना २७ कोटी ७६ लाख ४० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता भरपाईच्या प्रतीक्षेतील शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात मदतीची रक्कम वर्ग केली जाणार आहे.

राज्य सरकारने अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना वाढीव मदत देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पर्यायी त्यानुसार जिरायतीसाठी प्रतिहेक्टरी १३ हजार ६०० रुपये, बागायतीसाठी २७ हजार रुपये आणि बहुवार्षिक पिकांसाठी ३६ हजार रुपये (तीन हेक्टरपर्यंत मर्यादा) देण्याचा निर्णय झाला.

आतापर्यंत जून ते ऑक्टोबर या काळातील अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना पाच हजार ६६१ कोटी ३९ लाखांची मदत दिली आहे. दरम्यान, सप्टेंबर-ऑक्टोबरमधील सततचा पाऊस व ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत द्यावी, असा प्रस्ताव पुणे व नाशिक विभागीय आयुक्तालयाकडून सरकारला पाठविण्यात आला होता.

जिल्हा शेतकरी मदतीची रक्कम

पुणे जिल्ह्यात ५२,९०० शेतकऱ्यांना मिळाली ४२,८३,९९,००० इतकी मदत

सातारा जिल्ह्यात २४,७५४ शेतकऱ्यांना मिळाली १७,०४,३४,००० इतकी मदत

सांगली जिल्ह्यात ४५,८६८ शेतकऱ्यांना मिळाली ४२,२५,१६,००० इतकी मदत

सोलापूर जिल्ह्यात ६५,१६६ शेतकऱ्यांना मिळाली ११०,५६,५८,००० इतकी मदत

कोल्हापूर जिल्ह्यात ५,८६२ शेतकऱ्यांना मिळाली ३,७६,९४,००० इतकी मदत

नाशिक जिल्ह्यात ९८,२१० शेतकऱ्यांना मिळाली ८९,२०,५०,००० इतकी मदत

धुळे जिल्ह्यात ५७,९६४ शेतकऱ्यांना मिळाली ५१,०४,१८,००० इतकी मदत

जळगाव जिल्ह्यात २७,३७० शेतकऱ्यांना मिळाली २७,७६,४०,००० इतकी मदत

नगर जिल्ह्यात २,५४,६९१ शेतकऱ्यांना मिळाली २९०,९१,३३,००० इतकी मदत

नंदुरबार जिल्ह्यात १०७ शेतकऱ्यांना मिळाली ६,६८,००० इतकी मदत