खळबळजनक : बसस्थानकातून पळवून नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

मार्च 12, 2022 3:09 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मार्च २०२२ । धरणगाव शहरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचे चोपडा बसस्थानकातून अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका संशयिताला अटक करण्यात आली आहे.

rape jpg webp

धरणगाव शहरात १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. दि.१७ फेब्रुवारी रोजी अल्पवयीन मुलगी ही चोपडा येथे आपल्या आई-वडिलांसह आली होती. त्यावेळी संशयित आरोपी दीपक हिरामण पाटील रा.संजय नगर धरणगाव याने अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत चोपडा बसस्थानकातून पळवून नेले.

संशयिताने गुजरात आणि जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात नेऊन मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात पीडितेच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलीस ठाण्यात संशयित दीपक हिरामण पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी भास्करराव डेरे करीत आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपीला चोपडा शहर पोलिसांनी अटक केली आहे.

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now