⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | विशेष | 12वी पास झालात? मग आता पुढे काय? जाणून घ्या ‘हे’ टॉप करिअर ऑप्शन..

12वी पास झालात? मग आता पुढे काय? जाणून घ्या ‘हे’ टॉप करिअर ऑप्शन..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ मे २०२३ । शिक्षणाशिवाय गती नाही आणि गती शिवाय प्रगती नाही. हे म्हण प्रत्येकाला लागू असते. प्रत्येक जण आपआपल्या परीने शिक्षण घेत असतो. शिक्षणाची पहिली पायरी म्हणजे दहावी असते. त्यानंतर दुसरी पायरी ती बारावी. Top career option

दरम्यान, 25 मे रोजी महाराष्ट्र बोर्डाचा 12वीचा निकाल जाहीर झाला. यंदा 91.25 टक्के एवढा निकाल लागला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या निकालात 2.97 टक्क्यांची घट झाली आहे. एकूण 14 लाख 16 हजार 371 विद्यार्थ्यांपैकी 12 लाख 92 हजार 468 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर तब्बल 1 लाख 23 हजार 903 विद्यार्थी हे नापास झाले आहेत.

IDBI बँकेत तब्बल 1036 पदांवर भरती

परंतु, आता जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत त्यांच्यासाठी मात्र, करिअरच्या (Career) दृष्टीने महत्त्वाचे प्रश्न उपस्थित राहिले आहेत. मात्र, आज आम्ही तुम्हाला बारावीनंतर पुढे कोणता करिअर ऑप्शन निवडावा यासाठी काही पर्याय सांगणार आहोत. ज्यांचा वापर करून तुम्ही तुमचे उज्ज्वल भविष्य घडवू शकता. चला तर मंग जाणून घेऊयात..

विज्ञान शाखेतील करिअरच्या संधी :

जर तुम्ही विज्ञान शाखेचे विद्यार्थी आहात, तर तुम्ही पुढे B.Sc पदवीधर होऊ शकता. यामध्ये तुम्हाला रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित, जीवशास्त्र यांसारखे विषय किंवा यापैकी एक विषय निवडून त्यात पदवीधर होऊ शकता. तसेच पुढील अभ्यासक्रमासाठी तुम्ही एखाद्या नामांकित युनिव्हर्सिटीतून M.Sc देखील करू शकता.

बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी अभियांत्रिकीमध्ये आपले भविष्य घडवू शकतात तसेच आयआयटी आणि जेईई परीक्षेची तयारी करू शकतात. जर तुम्हाला अभियांत्रिकीचे शिक्षण घ्यायचे नसेल तर ते B.Sc, BA, ग्रॅज्युएशन आणि हॉटेल मॅनेजमेंट कोर्स करू शकतात.

बारावीनंतर कला शाखेतील करिअरच्या संधी :

खरंतर कला शाखेतील विद्यार्थ्यांसाठी बरेच करिअर ऑप्शन्स आहेत. जे तुमची आवडही जोपासण्यास मदत करतील तसेच तुम्हाला करिअरचा नवा मार्गही निर्माण करून देतील.

SBI बँकेचे 30 जूनपासून बदलणार ‘हे’ नियम

पाहा कला शाखेतील करिअरच्या संधी.

B.F.A (बॅचलर ऑफ फाईन आर्टस् )
B.J.M. (बॅचलर ऑफ जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन )
B.SW (बॅचलर ऑफ सोशल वर्क )
B.A (बॅचलर ऑफ आर्ट्स )
B.El.Ed (बॅचलर ऑफ एलिमेंटरी एज्युकेशन )
इंटिग्रेटेड लॉ कोर्स : लॉ अर्थात कायद्याच्या क्षेत्रात शिक्षण घेण्याचा एकूण कालावधी हा पाच वर्षांचा असतो. यात विविध कायदा प्रकारच्या कायद्याच्या क्षेत्रांचा समावेश असतो. उदाहरणार्थ वनविषयक कायदे, आयपीसी [IPC], ग्राहक संरक्षण कायदा, व्यावसायिक कायदा इत्यादी.
B. P. ED (बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन )
B.E.M (बॅचलर ऑफ इवेंट मॅनेजमेंट )
B.B.A. (बॅचलर ऑफ बिझनेस एॅडमिनिस्ट्रेशन ) : फक्त वाणिज्य शाखेतीलच नव्हे तर कला शाखेचे विद्यार्थी सुध्दा या क्षेत्रात करिअर घडवू शकतात.
B.H.M. (बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट )
B.M.M. (बॅचलर इन मास मीडिया)
फॅशन डिझायनिंग
होम सायन्स
इंटिरियर डिजाइनिंग
ग्राफिक डिझाईन
ट्युरिझम कोर्स

तसेच स्वतःचा वेगळा व्यवसाय देखील करू शकतात.

बारावीनंतर वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या संधी :
कॉर्पोरेट जगात काम करू इच्छिणारे विद्यार्थी सहसा त्यांच्या शिक्षणातील वाणिज्य क्षेत्राची निवड करतात आणि कॅट (CAT) , एक्सएट (XAT) आणि एमएटी (MAT) या परीक्षा देणे आवश्यक आहे. भारत आणि परदेशातील अनेक महाविद्यालये वाणिज्य क्षेत्रातील कोर्स उपलब्ध करुन देत आहेत. बारावी वाणिज्यानंतर डिप्लोमा अभ्यासक्रम, युजी अभ्यासक्रम (अंडर ग्रॅज्युएशन /Under Graduation) आणि पीजी अभ्यासक्रम (पोस्ट ग्रॅज्युएशन / Post Graduation) करण्याची शक्यता आहे.

बारावीत वाणिज्य विद्यार्थी म्हणून अर्थशास्त्र, लेखाशास्त्र, गणित आणि व्यवसाय अभ्यास या मूलभूत संकल्पनांविषयी तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. या संकल्पनांचे चांगले ज्ञान हे आपल्याला वाणिज्य क्षेत्रात आपल्या पुढील शिक्षणास मदत करेल.

वाणिज्य क्षेत्रात 12 वी पूर्ण केल्यानंतर आपल्याकडे निवडण्यासारखे बरेच पर्याय आहेत. बीबीए आणि बी.कॉम हे विद्यार्थ्यांनी निवडलेले सर्वात सामान्य कोर्स आहेत. बीबीए आणि बी.कॉम व्यतिरिक्त इतरही कोर्सेस उपलब्ध आहेत, ज्यात तुम्ही एक उत्तम करियर बनवू शकतात. जसे की तुम्ही

बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (B.M.S)
बॅचलर ऑफ बिझिनेस स्टडीज (B.B.S)
बॅचलर मास्टर ऑफ कॉमर्स (M.Com)
व्यवसाय प्रशासन मधील मास्टर (M.B.A)
बीएड (B.ed)
आयसीडब्ल्यूए बॅचलर इन लायब्ररी सायन्स
इंपोर्ट एक्सपोर्ट डिप्लोमा
एम.सी.ए. (MCA)
एल.एल.बी. (LLB)

MPSC : जळगावच्या बस चालकाची मुलगी बनली अधिकारी

यांसारखे करिअर ऑप्शन्स तुम्ही निवडू शकता. तसेच, तुम्हाला डिफेन्समध्ये जायचे असेल तर तुम्ही आर्मी, इंडियन नेव्ही, एअर फोर्समधील कोणतेही एक विभाग निवडून सरकारी नोकरी मिळवू शकता. यासाठी तुम्ही आधी एनडीएची तयारी करू शकता. तसेच तुम्हाला शिक्षणात किंवा नोकरीत फारसा रस नसेल तर तुम्ही स्वत:चा व्यवसाय देखील करू शकता.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.