जळगाव जिल्हा

जळगाव शहरातील या भागातील आजचा पाणीपुरवठा राहणार बंद?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑक्टोबर २०२४ । संपूर्ण शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ११६८ मिमी तर १५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम मनपाने हाती घेतल्याने पिंप्राळा गावठाण, अयोध्यानगरसह ४४ भागांत शनिवारी पाणीपुरवठा होणार नाही. हा पाणीपुरवठा एक दिक्स पुढे ढकलण्यात आला आहे. दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर तो सुरळीत केला जाणार आहे.

आज या भागात होणार नाही पाणीपुरवठा?
शहरात शनिवारी मेहरूण परिसरातील तांबापुरा, गणपतीनगर, आदर्शनगर, शिव कॉलनी, विद्युत कॉलनी, राका पार्क, अयोध्यानगर, म्हाडा कॉलनी, रायसोनी शाळेचा परिसर, अजिंठा हौसिंग सोसायटी, जगवानीनगर, सदाशिवनगर, रामनगर, रजा कॉलनी, अक्सानगर, गणेशपुरी, मलिकनगर, वाल्मीकनगर, कांचननगर, दिनकर नगर आसोदा रोडकडे जाणारा संपूर्ण परिसर, खंडेरावनगर परिसर, हरिविठ्ठलनगर परिसर, पिंप्राळा गावठाण परिसर, गायत्रीनगर, नूतन वर्षा कॉलनी, शारदा कॉलनी, दांडेकरनगर, मानराज पार्क, असावानगर, निसर्ग कॉलनी, द्रौपदीनगर, मुक्ताईनगर, धनश्रीनगर, पोलिस कॉलनी परिसर, खोटेनगर, शिवाजीनगर हुडको, प्रजापतनगर, एसएमआयटी परिसर, योगेश्वरनगर, हिरा पाइप, शंकररावनगर, खेडीगाव परिसर आदी भागांमध्ये पाणीपुरवठा होणार नाही.

दरम्यान, जलवाहिनी दुरुस्तीचे काम शुक्रवारी सायंकाळपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर नियमित पाणीपुरवठा केला जाईल. तत्पूर्वी नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा साठा जपून वापरावा. पाण्याची नासाडी होणार नाही या संदर्भात काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या माध्यमाने गुरुवारी करण्यात आले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button