⁠ 
गुरूवार, एप्रिल 18, 2024

जळगावकरांनो काळजी घ्या! पुन्हा वाढणार तापमानाचा पारा, पाहा आजचं तापमान

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मे २०२३ । राज्यात सध्या उकाडा प्रचंड वाढला आहे. गेल्या आठ्वड्यात जळगावात राज्यातील सर्वाधिक तापमान नोंदविल गेलं होते. जळगाव जिल्ह्यात दरवर्षी उन्हाची तीव्रता अधिक असते. Today Temperature in Jalgaon District

image 5

काही दिवसापूर्वी जळगावातील कमाल तापमानाचा आकडा हा 45 अंश सेल्सिअस पर्यंत नोंदवण्यात आला आहे. हे यंदाच्या वर्षीचे सर्वाधिक तापमान होते. यामुळे जळगावकर उकाड्यामुळे चांगेलच हैराण झाले होते.

image 2

मात्र ढगाळ वातावरणामुळे आता सध्या जिल्ह्यातील तापमानात घट झालेली दिसून येत आहे. तापमानाचा पारा 41 अंश सेल्सिअसच्या खाली आले आहे. आज 18 मे रोजी कमाल तापमान 40.5 अंश सेल्सिअस तर किमान तापमान हे 27 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.

image 3

मात्र, मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तापमानाचा पारा पुन्हा वाढणार आहे. तसेच याच वेळी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी लागेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

image 4

अशी काळजी घ्या?
शरीरात पाण्याचे प्रमाण जास्त ठेवण्याचा सल्ला डॉक्टरांच्या वतीने देण्यात येत आहे. त्यासाठी पाणी पिणे, रसदार फळे खाणे गरजेचे आहे.

image 6

जळगाव शहरासह जिल्ह्यातील लोकांनी दुपारच्या उन्हात बाहेर पडू नये. गरज असल्यास डोक्याला कापड, टोपी अथवा रुमाल घ्यावा आणि मगच बाहेर पडावे, असेही सांगण्यात आले आहे. आज देखील उन्हाची तीव्रता जास्त असल्याने शक्यतो काम असेल तरच आपण बाहेर पडावे.