नशिराबाद टोल नाक्याजवळ २५ लाखाची तंबाखू पकडली

नोव्हेंबर 17, 2024 9:55 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ नोव्हेंबर २०२४ । विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात निवडणूक आयोगाच्या विभागाकडून आणि पोलिसांकडून नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली जात असून याच दरम्यान भुसावळ-जळगाव महामार्गावरील नशिराबाद टोल नाक्याजवळ २५ लाखाची तंबाखू पकडली. सोबतच दोन वाहन, १० हजार रुपये किमतीचे दोन मोबाइल असा एकूण ३२ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, दोन जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध नशिराबाद पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime 2 jpg webp

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नशिराबाद टोल सुमारास नाक्याजवळ एसएसटी स्कॉडची नियुक्ती करण्यात आली आहे. १४ नोव्हेंबरच्या मध्यरात्री १.३० वाजेच्या भुसावळकडून जळगावकडे दोन चारचाकी (क्रमांक एमएच- १९, सीवाय ३३१७ व एमएच- १९, सीवाय ०४३०) सुसाट जात असताना स्कॉडने त्यांना थांबवून दोन्ही वाहनातील चालकांना नाव विचारल्यावर एकाने रूपेश भगवान वाघ तर दुसऱ्याने सुपडू बाबूराव पाटील असे सांगितले. स्कॉडने वाहनाची झडती घेतल्यावर त्यांना सुमारे २५ लाख रुपयांची तंबाखू वाहनात दिसून आली.

स्कॉडने लागलीच दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर मध्य प्रदेशातील सागरकुट्टी येथून तंबाखूचा माल घेऊन पाचोऱ्याला जात असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच त्यांच्याकडे कुठलीही पावती मिळून आली नाही. स्कॉडने महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेली तंबाखू जप्त केली. तर दोन्ही वाहन ताब्यात घेऊन नशिराबाद पोलिसांच्या ताब्यात दिले. तसेच दोघांचे मोबाइल सुध्दा जप्त करण्यात आले आहे.

मध्य प्रदेशात मुख्य गोडावून शोध घेणार पोलिसांनी पकडलेले दोघं पाचोऱ्यात तंबाखू, गुटख्याचा पुरवठा करणारे असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. पोलिस आता मध्य प्रदेशात जाऊन तंबाखूच्या मुख्य गोडावूनचा शोध घेणार आहेत. या प्रकरणी नशिराबाद पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पीएसआय गणेश देशमुख व प्रवीण लोहार हे करीत आहे. ही कारवाई एसएसटी पथक प्रमुख नीलेश सोनवणे, सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय दोरकर, योगेश खडके, सलीम शेख यांच्या पथकाने केली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now