⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

फ्लॅट फसवणूक प्रकरणी संशयित तिवारीला अटक

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मार्च २०२२ । शहरातील पिंप्राळा शिवारातील फ्लॅट विक्रीचा व्यवहार ठरलेला असतांना बनावट कागदपत्राद्वारे फ्लॅटसंदर्भात बनावट सौदापावती केल्याप्रकरणी जळगाव जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यातील मुख्य संशयित दिनेश तिवारीने दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावत त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली होती. दरम्यान, गुरुवारी पोलिसांनी तिवारीला अटक केली आहे.

फ्लॅट खरेदी फसवणूकप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात संशयित दिनेश रामचंद्र उर्फ रमेशचंद्र तिवारी, लीलाबाई दिनेश तिवारी (दोघी रा.वासूकमल नंदनवन अपार्टमेंट, मुक्ताईनगर जळगाव), प्रकाश शामलाल कटारिया (फुले मार्केट, जळगाव), अतुल अशोक खरे (रा. ३३२, जोशींपेठ जळगाव), निलेश सुभाष पाटील (रा. कुंभरिसीम, ता. जामनेर), प्रेमसिंग विश्वसिंग पाटील (रा. देवपिप्री, ता. जळगाव), बिरज इंदरचंद जैन (रा. आदर्श नगर, जळगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्ह्यात संशयित दिनेश तिवारी याने दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर दि.२८ रोजी न्या.मुगळीकर यांच्या न्यायालयात कामकाज झाले. फिर्यादीतर्फे ऍड.सुरज चौधरी यांनी बाजू मांडत जामीन फेटाळण्याची विनंती केली. दरम्यान, राज्यपाल दौऱ्यामुळे तपासी अंमलदार उपस्थित नव्हते. न्यायालयाने तिवारी याचा अटकपूर्व फेटाळून लावत त्याला न्यायालयीन कोठडी सुनावल्याची माहिती ऍड.चौधरी यांनी दिली. दरम्यान, अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर दि.३ रोजी पोलिसांनी तिवारी याला अटक केली आहे.