जळगाव लाईव्ह न्यूज । २९ सप्टेंबर २०२१। आजच्या दगदगीच्या जिवनात आरोग्याची हेळसांड होत आहे. कोणीही आरोग्याकडे लक्ष देत नाही, आणि एक दिवस असा येतो की आरोग्यासाठी चांगलीच किंमत मोजावी लागते, असे होऊ नये म्हणून वेळीच आपल्या आरोग्य तपासणी करणे गरजेचे असल्याने सर्वांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन सावदा नगरपालिकेचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी केले.
सावदा (ता. रावेर) येथे स्व. सुमन बाबुराव चौधरी बहूद्देशीय संस्थेतर्फे सरकारी कर्मचारी तसेच पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी भुसावळ येथील राकेश उदासी, संस्थेच्या अध्यक्षा सारिका चौधरी, सचिव राजेश चौधरी, प्रशासकीय अधिकारी सचिन चोळके, सहाय्यक प्रकल्प अधिकारी संदीप पाटील आदी उपस्थित होते.
पुढे बोलतांना श्री. चव्हाण म्हणाले की, नोकरी म्हंटली की टेन्शन हे येतच, परंतु टेन्शन न घेता हसतमुखाने काम करत रहायचे. टेन्शन घेतल्यास तुमची शुगर कमी जास्त होत असते, असेही ते म्हणले.
शंभरावर कर्मचारी, पत्रकारांची घेतला लाभ
सरकारी कर्मचारी यांनी कोरोना काळात मोठे योगदान दिले. त्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या हेतूने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात शंभरावर शासकीय कर्मचारी व पत्रकारांची तपासणी करण्यात आली. प्रत्येकाची शुगर (डायबिटीज) चेक करण्यात येऊन त्यांना लगेच रिपोर्ट देण्यात आले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी नगरपालिकेचे करनिरीक्षक अनिल आहुजा, अरुण ठोसरे, सर्वेश चौधरी, प्रेम पाटील, विशाल कदम, शब्बीर तडवी आदींनी परिश्रम घेतले. संस्थेचे सचिव राजेश चौधरी यांनी आभार मानले.