⁠ 
शनिवार, एप्रिल 13, 2024

‘वंचित बहुजन आघाडी’कडून रावेरमधून संजय ब्राह्मणे यांना उमेदवारी जाहीर

जळगाव लाईव्ह न्यूज । १ एप्रिल २०२४ । लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने आपल्या पक्षाच्या ११ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केलीय. विशेष या यादीत जळगाव जिल्ह्यातील रावेर मतदारसंघात उमेदवार जाहीर केला आहे. रावेरमधून संजय पंडीत ब्राह्मणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

एकीकडे महाविकास आघाडीकडून वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा सुरु असल्याचा दावा केला जात असाताना वंचित बहुजन आघाडीने आपल्या पक्षाच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केलीय. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला त्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

यापूर्वी वंचितच्या पहिल्या यादीत एकूण 8 जागांचा समावेश होता. तर दुसऱ्या यादीमध्ये 11 जागांचा समावेश आहे. दुसऱ्या यादीत रावेरमधून संजय पंडीत ब्राह्मणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, रावेरमधून भाजपने रक्षा खडसेंना पुन्हा उमेदवारी दिली. तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये रावेरची जागा राष्ट्रवादी शरद गटाच्या वाट्याला सुटली असून अद्यापही उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाहीय. त्यामुळे शरद पवार गटाकडून चाचपणी सुरु असून कोणाला उमेदवारी दिली जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या दुसऱ्या यादीतील उमेदवार
हिंगोली- डॉ. बी.डी. चव्हाण
लातूर- नरसिंगराव उदगीरकर
सोलापूर- राहुल गायकवाड
माढा- रमेश बारसकर
सातारा- मारुती जानकर
धुळे- अब्दुर रहमान
हातकणंगले- दादागौडा पाटील
रावेर- संजय पंडीत ब्राह्मणे
जालना- प्रभाकर बकले
मुंबई उत्तर मध्य- अबुल हसन खान
रत्नागिरी-सिंधुदुर्ग- काका जोशी