वाघ वाचवा संदेश देत वन्यजीवचे व्याघ्रदूत गावागावात करणार जनजागृती!
Jalgaon News-जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जुलै २०२२ । जागतिक व्याघ्र दिनाच्या पार्श्वभूमीवर मानव वन्यजीव संघर्ष टाळणे, आणि व्याघ्र संवर्धनासाठी वन्यजीव संरक्षण संस्था, वनविभाग जळगांव, यावल जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय जळगांव यांच्या सैयुक्त विद्यमाने जनजागृती कार्यक्रम हाती घेण्यात आला असून त्यासाठी उद्या 28 जुलै रोजी व्याघ्र संवर्धन जनजागृती मोटारसायकल रॅली जळगांव जिल्हाधिकारी कार्यालयातून काढण्यात येणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मुख्य वनसंरक्षक डिगंबर पगार, पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे, जळगांव उपवनसंरक्षक विवेक होशिंग, यावल उपवनसंरक्षक एच एस पद्मनाभा, टायगर कॉन्झर्वेशन अँड रिसर्च सेंटर मुंबई चे प्रसाद हिरे, स्टँडिंग फॉर टायगर फौंडेशन चे रवींद्र मोहो हे सहभागी होणार आहेत. तसेच आमदार राजुमामा भोळे, महापौर जयश्रीताई महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील हे देखील व्याघ्र दूतांचा सन्मान करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. असे जनजागृती कार्यक्रम सैयोजक रवींद्र फालक आणि बाळकृष्ण देवरे यांनी कळविले आहे.
वाघांची वेशभूषा आणि मुखवटे घातलेले व्याघ्र दूत, वाघ असलेले सजवलेले रेस्क्यू वाहन, विनोद ढगे यांचे करूया वाघाचे रक्षण पथनाट्य, आणि मानव वन्यजीव संघर्ष टाळण्या संदर्भातील माहिती पत्रके हे या वर्षीच्या जनजागृती रॅलीचे खास आकर्षण असणार आहे. गेल्या 2 वर्षा पासून कोरोना मुळे रॅलीचे आयोजन व्यापक स्तरावर करण्यात आले नव्हते यंदा मात्र जल्लोषात नियोजन सुरू असून जळगांव, धुळे, नंदुरबार, नासिक, ठाणे, वाशीम, शिर्डी येथून व्याघ्र दूत या महा रॅलीत सहभागी होणार असून उद्या 28 जुलै रोजी जळगांव, भुसावळ, वरणगाव, मुक्ताई नगर, या ठिकाणी जनजागृती केली जाईल तर 29 जुलै जागतिक व्याघ्र दिनी डोलारखेडा, चारठाणा, वायला दुई, सुकळी, राजुरा, आणि परिसरातील गावात पथनाट्य सादर करत मानव वन्यजीव संघर्ष बचाव , आणि वाघ वाचवा या विषयावर जनजागृती करण्यात येणार आहे
रॅली च्या यशस्वीते साठी मानद वन्यजीव रक्षक रवींद्र फालक, बाळकृष्ण देवरे, योगेश गालफाडे, सतीश कांबळे, जगदीश बैरागी, राजेश सोनवणे, निलेश ढाके, राहुल सोनवणे, ऋषी राजपूत, वासुदेव वाढे, विजय रायपुरे, अलेक्स प्रेसडी, अमन गुजर, रवींद्र सपकाळे, रवींद्र सोनवणे, अजीम काझी, प्रदीप शेळके, विनोद सोनवणे, भूषण चौधरी, ललित शिरसाठे, बबलू शिंदे, हेमराज सोनवणे, विनोद ढगे, दुर्गेश आंबेकर, परिश्रम घेत आहेत जास्तीत जास्त नागरिकांनी या महारॅलीत सहभागी होऊन व्याघ्रदूतांचे स्वागत करावे असे निमंत्रक योगेश गालफाडे यांनी आवाहन केले आहे.