वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्याचा डीन अॅड्रेस समारोह
जळगाव लाईव्ह न्यूज । ८ नोव्हेंबर २०२४ । डॉ. उल्हास पाटील महाविद्यालयात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतलेले विद्यार्थी भाग्यशाली आहेत. कारण महाविद्यालयात विद्यार्थ्यांंना शैक्षणिक ज्ञान प्राप्तीसाठी आवश्यक त्या सर्व प्रकारच्या सुविधा ह्या ठिकाणी उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी प्रचंड अभ्यास, कठोर परिश्रम आणि संशोधन वृत्ती कायम ठेवत शक्तीशाली चिकीत्सक व्हावे असा कानमंत्र संस्थेचे चेअरमन माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी शुक्रवारी आयोजित डीन अॅड्रेस समारंभात दिला.
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात प्रथम वर्ष एमबीबीएससाठी प्रवेश घेतल्या विद्यार्थ्यांकरीता डीन अॅड्रेस समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. व्यासपीठावर महाविद्यालयाचे डीन डॉ. प्रशांत सोळंके, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रेमकुमार पंडीत, विभागप्रमुख डॉ. अमृत महाजन, बालरोग विभाग प्रमुख डॉ. अनंत बेंडाळे, मेडीसीन विभागाचे डॉ. चंद्रय्या कांते, डॉ. सी.डी. सारंग, अस्थिरोग विभाग प्रमुख डॉ. दीपक अग्रवाल, नाक-कान-घसा विभागप्रमुक डॉ. अनुश्री अग्रवाल, भूलशास्त्र विभागप्रमुख डॉ. देवेंद्र चौधरी, शल्यचिकीत्सा विभागाचे प्रमुख डॉ. शिवाजी सादुलवाड उपस्थित होते. समारंभाच्या सुरूवातीला डीन डॉ. प्रशांत सोळंके यांनी वैद्यकीय महाविद्यालयात नव्याने प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील होस्टेल, मेस, मैदान, लायब्ररी, विविध खेळ विषयक माहिती दिली. तसेच डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय हे एकमेव अशी संस्था आहे ज्याठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रगतीबाबत काळजी घेतली जाते. विद्यार्थ्यांनी वैद्यकीय महाविद्यालयातील सुविधांचा लाभ घेण्यासोबत पालकांच्या चेहर्यावर यशाचा आनंद झळकवावा असे आवाहन त्यांनी केले.
अध्यक्षीय मार्गदर्शनात चेअरमन डॉ. उल्हास पाटील यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी संगीत आणि वैद्यकीय क्षेत्र याठिकाणी असलेल्या गुरू आणि शिक्षकांचा सन्मान ठेवावा. कारण पुढील पाच वर्ष ते तुमच्यासाठी महत्वाची भूमिका बजावणार आहेत. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात १० विद्यार्थ्यांसाठी एक शव उपलब्ध करून दिले आहे, जे राज्यात कुठेेही नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी विच्छेदन प्रक्रिया समजून घेत संशोधन वृत्ती जोपासली पाहीजे. विद्यार्थ्यांनी वैद्यकीय महाविद्यालयात अभ्यासासोबत होणार्या प्रत्येक उपक्रमात सहभागी होऊन अष्टपैलू व्हावे. शक्तीशाली चिकीत्सक होण्यासाठी दररोज अभ्यासात सातत्य ठेवा, लायब्ररीत तासन् तास पाठांतर करा, आपला गणवेश स्वच्छ आणि निटनेटका ठेवा, या महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या २०० विद्यार्थ्यांनी मास्टरमाइंड होत फेरारी कार घेण्याचे स्वप्न उराशी बाळगावे असे आवाहनही डॉ. उल्हास पाटील यांनी केले.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी कार्यक्रमाला वैद्यकीय महाविद्यालयाचे रजीस्ट्रार प्रमोद भिरूड, डॉ. नीलेश बेंडाळे, डॉ. जमीर खान, डॉ. रासिका सक्सेना, डॉ. पूनम टेंगनकई, डॉ. प्रिती सोळंके, डॉ. गायत्री पाटील, डॉ. आयुष महाजन,पॅथॉलॉजी प्रमुख डॉ. शिरीष गोंडाणे यांच्यासह प्राध्यापक व प्रशासन विभागाचे अनंत इंगळे, पंकज राणे, ललित बोंडे, अमोल बोंडे, मिलींद सरोदे, नंदू शेळके, तनुजा भिरूड, भावना अत्तरदे उपस्थित होते.
यांनी घेतले परिश्रम
यशस्वीतेसाठी गजानन जाधव, गोपाल नांदुरकर, परेश बोरोले, रोशन महाजन, राजेंद्र धांडे, वंदना पाटील, सुवर्णा बोरोले, नीलेश धांडे, राजू राणे, विकास पाटील, रितेश बोरोले यांनी परिश्रम घेतले.