भरधाव कार झाडाला धडकली; रावेरचे तिघे तरुण जागीच ठार

डिसेंबर 20, 2024 11:03 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २० डिसेंबर २०२४ । जळगाव जिल्ह्यात रस्ते अपघाताच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. यात अनेकांना जीवावर मुकावे लागत आहे. यातच सावदा-भुसावळ मार्गावरील पिंपरूळ जवळ मध्यरात्री एक भीषण अपघात झाला. ज्यात रावेर शहरातील तीन युवकांचा दुर्दैवी मृत्यु झाला.ही वार्ता रावेर शहरात पसरताच नागरिकांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे.

pimparud car accident

वृत्तानुसार, भुसावळहून सावदा मार्गे रावेरकडे येत असताना एमएच २० सीएस ८००२ नंबरची कार भरधाव वेगाने झाडाला जोरदार टक्कर दिली. या दुर्घटनेत रावेर शहरातील शुभम सोनार (वय २५), मुकेश रायपूरकर (वय २३) व जयेश भोई या तिघांचा जागीच मृत्यू झाला.

तर, गणेश भोई (फोटोग्राफर) व एक अन्य व्यक्ती गंभीर जखमी झाले आहेत, ज्यांच्यावर जळगाव येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. ही दुर्घटना रात्री दोन वाजता पिंपरूळ व सावदा दरम्यान घडल्याचे सूत्रांकडून समजले आहे. दुर्घटना इतकी भीषण होती की गाडीचा चुराडा झाला आहे.रावेर शहरात ही वार्ता पसरताच शोकाचे वातावरण निर्माण झाले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now