जळगाव जिल्हा हादरला ; भीषण अपघातात तीन महिला ठार, 22 जण गंभीर जखमी

डिसेंबर 1, 2023 9:14 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १ डिसेंबर २०२३ । पारोळा तालुक्यात भीषण अपघाताची घटना समोर आली असून ट्रक,जीप आणि पिकअप वाहनाच्या झालेल्या विचित्र अपघातात तीन महिला जागीच ठार झाल्या आहेत. तर या दुर्घटनेत 22 जण गंभीर जखमी झाले आहे. ही दुर्दैवी घटना आज शुक्रवारी दुपारी विचखेडा फाट्याजवळ घडली.

parola taluka accident jpg webp

याबाबत असे की, पारोळा तालुक्यातील बोळे येथून चिलाणे ता.शिंदखेडा येथे एका अंत्यसंस्कारसाठी प्रवाशी वाहतूक करणारे वाहन क्रमांक (एमएच-१८ एम ५५५४) हे २२ जणांना घेऊन जात होते. सकाळी १२ वाजेच्या सुमारास लोखंडी रोल असलेला एक कंटेनर क्रमांक (जीजे १२ बीडब्ल्यू ७२५४) चा ताबा सुटल्याने भरधाव वाहने पिकअप वाहनाला जोरदार धडक दिली.

या भीषण आपघातात रेखाबाई गणेश कोळी (वय ५५), योगिता रवींद्र पाटील (वय ४०, दोन्ही रा. बोळे ता. पारोळा) , चंदनबाई गिरासे (वय ६५) या तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर एकूण २१ जण गंभीर जखमी झाले आहे. यातील तिघांना धुळे तर इतरांना प्राथमिक उपचार करून खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. अपघाताचे वृत्त कळताच बोळे परिसरातून शेकडो नागरिकांनी अपघात स्थळी तसेच कुटीर रुग्णालय परिसरात एकच गर्दी केली होती.

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पारोळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेवून बचावकार्याला सुरूवात केली. दरम्यान, यावेळी रोडवरील दोन्ही बाजूची वाहनांची कोंडी झाल्याचे दिसून आले. याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now