जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ थांबेना ! एकाच दिवसात बुलेटसह तीन दुचाक्या लांबविल्या

जानेवारी 24, 2026 5:11 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरात शहरात दुचाकी चोरीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून शहराच्या विविध भागांतून एक महागडी बुलेट आणि दोन दुचाकी चोरीला गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या प्रकरणी जिल्हापेठ, रामानंदनगर व एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

crime chor

ओंकार नगरातील रहिवासी उमेश ललित सूर्यवंशी हे २० जानेवारी रोजी चोपडा मार्केट परिसरात काही कामासाठी गेले होते. त्यांनी आपली दुचाकी (क्रमांक एमएच- १९, डीए-५०१७) मार्केटमध्ये उभी केली होती; मात्र अवघ्या दोन तासांत चोरट्यांनी त्यांची दुचाकी लंपास केली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisements

दुसरी घटना नागेश्वर कॉलनी परिसरात घडली. सुनील सदानंदन किझुमायील यांची ४५ हजार रुपये किमतीची बुलेट (क्रमांक एमएच- १९, सीएच- ००८९) १७ जानेवारी रोजी मध्यरात्री त्यांच्या घरासमोरून चोरट्यांनी चोरून नेली. या प्रकरणी मंगळवारी रामानंदनगर पोलिसांत तक्रार दिल्यानंतर गुन्हा नोंद झाला आहे. चोरीची तिसरी घटना पांडुरंगनगर भागात घडली. जितेंद्र निंबा चौधरी यांनी १४ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता आपली दुचाकी (एमएच-४१, एडी-८१४९) फुले मार्केटमध्ये उभी केली होती. रात्री ८ वाजता त्यांनी पाहिले असता दुचाकी जागेवर नव्हती. या प्रकरणी शहर पोलिसांत गुन्ह्याची नोंद केली आहे.

Advertisements

अयोध्या नगरातील लक्ष्मी पार्कमधील घरासमोरून चोरट्यांनी मंगळवारी दुचाकी लंपास केली. जितेंद्र संजय पाटील (वय ३३) या व्यवसायाने चालकाची दुचाकी घरासमोर लावली होती. ती चोरीला गेल्याचे लक्षात आले. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल रामकृष्ण पाटील हे करीत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now