जामनेर तालुक्यामध्ये तीन अपघातात तीन जण ठार ; ११ जखमी

मे 11, 2025 8:01 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मे २०२५ । जळगाव जिल्ह्यात अपघाताच्या घटना काही केल्या कमी होताना दिसत नसून अशातच जामनेर तालुक्यात तीन अपघातांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून, ११ जण जखमी झाले आहेत. यातील दोन घटनांमध्ये दोघेही दुचाकीस्वार ठार झाले आहेत. तर तिसऱ्या घटनेत, कंटेनरने क्रुझरला घडक दिल्याने एक जण ठार तर ११ जखमी झाल्याची घटना सोनाळा फाट्याजवळ घडली.

jalgaon mahanagar palika 10 jpg webp

मिळालेल्या माहितीनुसार, भवानी घाटात वाहनाला ओव्हरटेक करताना झालेल्या दुचाकी अपघातात राहुल रामदास सुरशे (रा. चिखली, जिल्हा बुलढाणा, वय ३५) तरुण जागीच ठार झाला. तर सुरेश सुनील पवार हा गंभीर जखमी झाला असून, त्यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

तर दुसऱ्या एका घटनेत दुपारी तीन वाजेदरम्यान जामनेरकडून शहापूरकडे जाणाऱ्या एका अज्ञात दुचाकीस्वारास अज्ञात वाहनाने धडक दिली. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला होता. त्यास उपचारार्थ जळगाव येथे हलविले. मात्र जळगाव येथे अज्ञात दुचाकीस्वारास दाखल करण्यापूर्वीच तो मृत झाला होता असे पोलिसांनी सांगितले. त्यांची ओळख रात्री उशिरापर्यंत पटली नव्हती. याबाबत जामनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास जामनेर पोलिस करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment