गुन्हे

चोरीच्या आठ दुचाकीसह तिघे पोलिसांच्या जाळ्यात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जुलै २०२४ । जळगाव शहर पोलीस स्थानकातील गुन्हे शाखेच्या पथकाने दुचाकींची चोरुन त्या विक्री करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून चोरीच्या आठ दुचाकी हस्तगत केल्या असून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम भगवान चौधरी (वय २५), मोईन मुक्तार मणियार (वय १८), ओम सुरेश हटकर (वय १८, तिघे रा. रिंगणगाव, ता. एरंडोल) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

खरंतर जळगाव शहरातील शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी बाजारपेठ असल्याने याठिकाणी जिलह्यातील नागरिक खरेदीसाठ येत असल्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. हीच संधी साधत चोरट्यांनी शहरातील मार्केट परिसरातून दुचाकी चोरीचा धडाकाच लावला होता.

हे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक डॉ. महेश्र्वर रेड्डी, पोलीस उपअधीक्षक संदीप गावित यांनी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक भवारी यांनी गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांचे पथक तयार करुन रवाना केले होते. काही संशयित चोरीची दुचाकी घेवून संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांना मिळाली होती.

सापळा रचून बसलेल्या पथकाने गोलाणी मार्केट परिसरातून संशयित शुभम भगवान चौधरी, मोईन मुक्तार मणियार, ओम सुरेश हटकर या तिघांना शुक्रवार १२ जुलै रोजी दुपारी २ वाजता अटक केली आहे. त्यांनी आपण दोन अल्पवयीन मुलांच्या मदतीने शहरातील विविध भागांमधून दुचाकी चोरी केल्याची कबुली देत आठ दुचाकी काढून दिल्या. पोलिसांनी त्या आठ दुचाकी जप्त केल्या आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button