⁠ 
शनिवार, मे 18, 2024

चिनावल जवळ अवैध गोवंश वाहतूक करणाऱ्या वाहनांना पकडले

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Sawada News-जळगाव लाईव्ह न्यूज । दीपक श्रावगे । जिल्ह्यातील अनेक परिसातून अवैध गोवंश वाहतूक होत असल्याचे समोर आहे. कुभारखेडा चिनावल रस्त्यांवर अवैध रित्या गोवंश वाहतूक करणाऱ्या वाहनांची चिनावल येथील गो भक्तांना माहिती मिळाल्याने मंगळवारी सकाळी सावदा पोलिसांच्या मदतीने वाहनांना पकडून सावदा पोलिसांत या प्रकरणी नोंद करण्यात आली आहे.

पोहेका सुधीर मोरे यांनी सावदा पोलिसांत फिर्याद दाखल केली. चिनावल येथील गो भक्तांना या अवैध वाहतूक ची माहिती मिळाली, त्यांनी याबाबत खात्री झालेवर सावदा पोलिस स्टेशनला या बाबतीत माहिती देवून कुभारखेडा रस्त्यावर निर्मल युवराज महाजन यांचे शेताजवळ सकाळी ६ वा. १५ मि. एम एच ०४ डी के ५१०२ मालवा व एम एच ०४ इ वाय २११८ छोटा हत्ती या गाड्या अडवून गाडी चालकांनी दाटी वाटी ने गायी व वासरे कोंबून मान व पाय दोराने बांधून हालचाली स पुरेशी जागा न ठेवता एका ठिकाणाहून दुसरीकडे नेणे हा गुन्हा करीत असताना पकडले त्यांची खबरी वरून वरील तक्रार दाखल झाली आहे. यात गायी वासरे तसेच गाडी सह सुमारे सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याबाबत सावदा पोलिसांत सीडीएम एस १९/ २२ अन्वये प्राण्याचा छळ कायदा अधिनियम १९६० कलम ११ ( १ ) १९८९ चे कलम ११९ मोटर वाहन अधिनियम १९८९ कलम ८३ अन्वये फिर्याद दाखल होवून आबीद उर्फ नव्वद व मो.फैजान शेख सगिर या सावदा यांना ताब्यात घेतले आहे.