जळगावात वाहनचोरीच्या घटना थांबेना..! घरासमोरून तरुणाची कार लांबविली

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जानेवारी २०२३ । जळगाव शहरात दुचाकी चोरीच्या घटना प्रचंड वाढल्या आहेत. वाढत्या या चोरीच्या घटनांमुळे वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशातच आता शहरातून चारचाकी चोरी चोरून नेल्याची घटना समोर आलीय. शहरातील शाहू नगर परिसरातील एका तरूणाची घरासमोरून तवेरा कार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी काय आहे घटना?
जितेंद्र कैलास मुळीक (वय-३८) रा. महेश किरणा जवळ, शाहूनगर जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. खासगी वाहन चालवून आपला उदरनिर्वाह करतो. त्यांच्याकडे त्याच्या मालकीची (एमएच १९ बीजे ००५७) क्रमांकाची कार आहे. नेहमी प्रमाणे तवेरा कार ४ जानेवारी रोजी रात्री १० वाजता शाहु नगरातील नक्षत्र बिल्डींग जवळ पार्किंगला लावलेली होती.

मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी १ लाख ८० हजार रूपये किंमतीच कार चोरून नेल्याचे ५ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता उघडकीला आले. त्यांने कारचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर शनिवारी ७ जानेवारी रोजी दुपारी १ वाजात शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रफुल्ल धांडे करीत आहे.