जामनेरात प्रवासी रिक्षाला आणि सिमेंट मिक्सरचा भीषण अपघात; तीन जण ठार, सहा प्रवासी जखमी

डिसेंबर 14, 2025 8:46 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । जामनेर तालुक्यातील गंगापुरी ते गारखेडेदरम्यान भीषण अपघात झाला. यात भुसावळहून जामनेरकडे येणाऱ्या प्रवासी रिक्षाला समोरून येणाऱ्या सिमेंट मिक्सर वाहनाने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात ३ जण ठार झाले. तर सहा प्रवासी जखमी झाले आहेत.

jalgaon mahanagar palika 10 jpg webp

मृतांमध्ये सरला गोपाळ निंबाळकर (वय ४२) आणि त्यांची मुलगी निकिता गोपाळ निंबाळकर (२०, दोन्ही रा. चिंचखेडे बुद्रूक, ता. जामनेर) आणि प्रमोद श्रीराम गुरुभैया (३२, रा. तळेगाव, ता. जामनेर) यांचा समावेश आहे. यातील निकिता हीच तीन महिन्यावर लग्न आले होते.

मिक्सर ट्रक क्रमांक एम एच 19 सी एक्स 2181 या गाडीने पियाजो रिक्षा क्रमांक एम एच 19 व्ही 3704 ला जबरदस्त धडक दिली. रिक्षात एकूण आठ प्रवासी बसलेले होते त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला. तर जयेश निंबाळकर (वय (४५, १६), योगेश गायकवाड रिक्षाचालक, रा. विवेकानंद नगर, जामनेर), सुरेखा विलास कापडे (५०) संगीता सुभाष चौधरी (५०, दोन्ही रा. छत्रपती संभाजीनगर), अखिलेश कुमार (५०, रा. उत्तर प्रदेश) हे जखमी झाले आहे. धडक बसताच रिक्षा पूर्णपणे गोल फिरून रस्त्याच्या बाजूला उलटली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now