जळगावात भाजपची पुन्हा कारवाई! निवडणुकीपूर्वी तीन पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी

जानेवारी 12, 2026 6:09 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जानेवारी २०२६ । महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत जळगावमध्ये भाजपने पुन्हा एकदा कारवाई केलीय. पक्षशिस्त आणि धोरणांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत तीन पदाधिकारी व कार्यकर्त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. यामध्ये जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष अक्षय सोनवणे यांचाही समावेश आहे.

bjp

जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत पक्षाची प्रतिमा मलिन होऊ नये आणि संघटनात्मक शिस्त कायम राहावी, यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत संबंधित पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. भाजपच्या अधिकृत धोरणांना हरताळ फासणे आणि पक्षविरोधी कारवाया करणे, यामुळे पक्षाच्या प्रतिमेला बाधा निर्माण होत असल्याचे निष्पन्न झाले.

याचाच परिणाम म्हणून, भाजपच्या कोअर कमिटीने संबंधित पदाधिकाऱ्यांचे प्राथमिक सदस्यत्व आणि त्यांच्याकडे असलेली सर्व पदे रद्द करत पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. यामध्ये अक्षय चत्रभुज सोनवणे: (जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष), किशोर (श्रीकृष्ण) गोविंदा वाघ: (प्रभाग १९ ‘ड’ मधून अपक्ष उमेदवारी केल्याने कारवाई), देवयानी सुभाष चौधरी: (प्रभाग १३ ‘ब’ मधून राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गटाकडून निवडणूक लढवत असल्याने कारवाई) यांचा समावेश आहे.

याआधी भाजपने तब्बल २७ जणांची पक्षातून हकालपट्टी केली होती. यानंतर तीन पदाधिकारी व कार्यकर्त्यांची हकालपट्टी करण्यात आल्यामुळे जळगाव भाजपच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now