सोमवार, डिसेंबर 11, 2023

चोरीच्या सात दुचाकींसह तिघांना अटक ; भुसावळ बाजारपेठ पोलिसांची कामगिरी

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ ऑक्टोबर २०२३ । दुचाकी चोरी करणाऱ्या तीन संशयित चोरट्यांना भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून चोरी केलेल्या सात दुचाकी हस्तगत केल्या आहे. सैय्यद शहारुख सैय्यद रहेमान (वय-२९, रा. पंचशिल नगर भुसावळ), कामीलोद्दीन अजीजउद्दीन (वय-३०, रा. फैजपुर ता. यावल) दानिश उर्फ गोलू शरीफ खान (वय-२४ रा. दिन दयाल नगर, भुसावळ) असे अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. याबाबत तिघांवर भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत असं कि, जळगाव भुसावळ आणि अमळनेर शहरातून दुचाकी चोरी करून संशयित आरोपी भुसावळ शहरात फिरत असल्याची गोपनीय माहिती भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी गुन्हे शोध पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान पोलीस पथकाने शुक्रवार २० ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता भुसावळ शहरात कारवाई करत संशयित आरोपी सैय्यद शहारुख सैय्यद रहेमान (वय-२९, रा. पंचशिल नगर भुसावळ) याला अटक केली.

त्याची कसून चौकशी केली असता त्यांनी दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली असून या दुचाकी अमळनेर, जळगाव आणि भुसावळ शहरातून चोरी केल्याचे सांगितले ही चोरी त्याचे साथीदार दानिश उर्फ गोलू शरीफ खान (वय-२४ रा. दिन दयाल नगर, भुसावळ), आणि कामीलोद्दीन अजीजउद्दीन (वय-३०, रा. फैजपुर ता. यावल) यांच्यासोबत केल्याचे सांगितले त्यानुसार पोलिसांनी दोघांनाही देखील अटक केली आहे. तिघांकडून चोरीच्या ७ दुचाकी हस्तगत करण्यात आले आहे. तिघांवर भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीनही संशय आरोपींना न्यायालयात हजर केले असता ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.